(सहज सुचलेल )
फ्लॉरेंस नाईटेंगल …उद्या तुमचा जन्मदिवस ..१२ मे १८२० चा जन्म ..परिचर्या व्यवसायाची आद्यजननी तू. १५० वर्षांनंतर मला अपेक्षित अशी परिचर्या असेल असं म्हटल्या होत्या तुम्ही. सर्वांना माहित आहे हा सेवाभाव म्हणजे क्रिमीयन युध्दात धडाडीने स्वतःहून, उच्चभ्रू कुटूंबातील असूनसुध्दा, तूम्ही थेट जखमी सैनिकांच्या सेवेत उतरल्या.रात्रीच्या अंधारात सैनिकांना दिवा घेवून त्यांना आहार,स्वच्छता,आरोग्य दिले व मृत्यूदर ४०% वरून २% वर आणला. तुमचा वारसा घेवून या व्यवसायात आलेल्या या परिचारीका तुमचा कित्ता आजपर्यंत गिरवत आल्याच आहेत ..मुळात हा व्यवसाय असतो का ?मुले पण यात असतात का ? असे विचारणारे लोक परिचारीकांचा सन्मान करायला लागले आहेत बरका.. परिचारीका नेहमीच अत्यंत प्रामाणिकपणे सेवाभावी वृत्तीने काम करतात पण कोरोनाकाळात लोकांना परिचारीकांचे महत्व पटायला लागल आहे बरका कारण जिथे रक्ताची नाती या आजारामुळे दूर जातात तिथे रक्ताचे नसूनही लोकांना जवळचे वाटणारे असे हे परिचारीकेचे नाते ….आजपर्यंत त्यांना मानाच स्थान न देणारा समाज काल परवा म्हणे पुणे,नागपूर आणि ब-याच शहरात त्यांचे स्वागत करताना पाहायला मिळत आहे तसे विडीयोच आहेत..खरोखरच मनापासून कौतुक करावस वाटत आहे त्यांचे,त्या आई,बहीण,पत्नी,पती,भाऊ,वडील ही नाती विसरून त्यांचा त्याग करून रूग्णसेवेला प्राधान्य देतायत ..ऐक सम व्यवसायी म्हणून विचार येतो की यांच्या सारख्याच असतील फ्लॉरेंस…काय तो त्याग,निष्ठा,निडरता,शिस्त,जिद्द,प्रेम,वात्सल्य,कर्तव्यदक्षता किती गुणांचा उल्लेख करावा …शब्द अपुरे पडतात ..त्या तुमच्याप्रमाणे दिवा हाती घेवून नाहीत पण पीपीई घालून खुप अडचणींतून रूग्णसेवा देतात..कोरोना ला हरवणे ईतकेच ध्येय घेवून झपाटलेल्या ह्या, रूग्णसेवा देताना रात्रभर जाग्या राहतात…पीपीई काढल्यानंतरची त्यांची अवस्था शब्दात सांगता येणार नाही ..पण म्हणून न डगमगता पुढील सेवेसाठी तयार राहतात…खुप मोठ कार्य आहे.थेट युध्दाचाच भाग बनल्या आहेत तुमच्या परिचारीका..तुम्ही(फ्लॉरेंस) जिथे कुठे असाल तिथे अभिमानाने फुलून येईल छाती तुमची असा वारसा चालवत आहेत..समाजाकडून इतकीच माफक अपेक्षा की आज जो आदर, सन्मान या व्यावसायीकांना देताय तो कायम ठेवा …फक्त कोरोनाच नाही अनेक मोठ्या आजारातून, स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवतायत या परिचारीका पण त्यांची महती आता समाजाला पटली.त्यांच्या या सेवेला कायम सलाम करा..कारण त्या आहेत म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचे आरोग्य आहे..ह्या सैनिकांइतक्याच महत्वाच्या आहेत ..या जैवीक युध्दात स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचा जीव वाचवतायत..कायमच हे स्मरणात ठेवा…
श्री प्रतीक जोशी
Your evry word is very heavy…you have given a mirror image of we Nurses situation of today..We are far from our family kids..with heavy heart..And we are Serving Our people because we are a Nurse…As we have pledged for whole life..and Very much proud to carry out our responsibility with tears in Eyes and speechless work..Thank you Mr.Pratik for encouraging words..and enlightening a Nurse once again..
Thanking you
Preety P Dhilpe